अटल निवृत्तीवेतन योजनेतील सदस्य संख्या 1 कोटी 24 लाखांवर

अटल निवृत्तीवेतन योजना ही भारत सरकारची निवृत्तीवेतन हमी योजना आहे. या योजनेखालील सदस्य संख्या 1 कोटी 24 लाखांवर पोहोचली आहे. भारत सरकारने या योजनेअंतर्गत, निवृत्तीवेतनाची हमी दिली आहे. ही योजना अत्यंत पारदर्शक असून 2018-19 या चालू आर्थिक वर्षात या योजनेचे 27 लाखाहून अधिक नवीन सदस्य झाले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश ही राज्ये या योजनेतील सभासद नोंदणीत अव्वल आहेत. 18 ते 40 वयोगटातला कोणताही भारतीय नागरिक त्यांचे बचत खाते असणाऱ्या बँक किंवा टपाल कार्यालयाच्या माध्यमातून ही योजना सुरू करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.