अखेर  ठाणे कोपरीपूर्वेला महानगरची  गॅस सेवा  सुरू-खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

( म विजय )

प्रतिनिधी  गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या   महानगरगॅसची सेवा आज  कोपरी पूर्व येथे सुरू करण्यात खासदार राजन विचारे यांना यश आले असुन त्याचे उदघाटन मा पालकमंत्रीश्री. एकनाथजी शिंदे साहेब ( पालक मंत्री ठाणे जिल्हा,   सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र प्रदेश ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून त्यावेळी खासदार श्री. ऱाजनजी विचारे ,आमदार रविंद्र फाटक, महानगरगॅसचे  प्रोजेक्ट मनेजर सचिन परदेसी ,  स्थानिक नगरसेविका सौ. मालती रमाकांत पाटील , सौ. शर्मिला रोहित गायकवाड, सौ शर्मिला  हेमंत पमनानी ,माजी नगरसेवक -विभागप्रमुख श्री. गिरीश राजे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटिल  ,श्रीमती ज्योतीताई कोळी, सौ. निर्मलाताई काळे, उपविभागप्रमुख हिंगे  ,शाखाप्रमुख संतोष बोडके ,रमाकांत पाटिल ,रोहित गायकवाड ,हेमंत पमनानी,प्रशांत पाटिल ,जितेन्द्र म्हात्रे ,राजू शेलार, पांडुरंग दळवी   व शिवसेना पदधिकारी तसेच नागरिक मोठ्या सखेने उपस्थित होते आदी उपस्थित होते

गेली अनेक वर्षांपासुन ठाणे कोपरी पुर्व विभागात महानगर गॅसची लाईन टाकून झाली होती परंतु ती तांत्रिक कारणास्तव मुख्य गॅसच्या लाईनला जोडण्याची राहीली होती.या साठी खासदार रेल्वे कडे सतत प्रयत्नशील होते त्यानंतर ही लाईन मुलुंड वरून हरि ओम मार्गे कोपरीत आणण्याचे ठरले  त्यानंतर स्थानिक नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब ( पालक मंत्री ठाणे जिल्हा,   सार्वजनिक बांधकाम3 मंत्री,महाराष्ट्र प्रदेश ) तसेच कार्यसम्राट   खासदार श्री. ऱाजनजी विचारे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने व संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तसेचP.W.D च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच B.M.Cच्या आयुक्तांशी वेळोवेळी संपर्क साधुन खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत लाईन टाकण्यात आली होती व अखेरीस नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्री. ऱाजन विचारे साहेब यांच्या प्रयत्नाला यश येउन नवघर म्हाडा कॉलनी मुलुंड पुर्व येथे असलेल्या महानगर गॅसच्या मुख्य गॅस वाहीनी वरुन पाईप लाईन जोडून ती ठाणे पुर्वतील कोपरीकर नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत्याचा  पहिल्या टप्यातील आज लव कुश सोसायटी पासून  सुरु करण्यात आला असून  या परिसरातील  गौरव आनंद , ऋतुराज , वामानकृपा ,मंगल वास्तू ,डोग्रा पॅलेस, उषा अपार्टमेंट या सोसायटीतील २५० कुटुंबाना सुरु करण्यात आला आहे त्यानंतर दुसरा टप्यातील कोपरी गाव  ठाणेकर वाडी येथील योगेश्वर ,ढाकली धाम  ,कन्हया नगर  येथील ११०० कुटुंबाना गॅस सुरु करण्यात येणार असून तिसरा टप्पा स्टेशन परिसर  सिद्धिविनायक चौक येथील इमारतींना सुरु करण्यात येणार असून   या परिसरातील नागरिकांना ही लवकरच  महानगरगॅसची सेवा सुरु करण्यात येणार आहे .  या  कार्यक्रमानंतर खासदार राजन विचारे यांनी दिवस रात्र काम करणाऱ्या  महानगरगॅसच्या टीम चे  अभिनंदन करून त्यांना पुढील कामे लवकर मार्गी लावण्यासाठी शुभेच्या दिल्या .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email