अखेर उल्हासनगर महापालिका आयुक्तांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

( तेजस राजे )

रिपाइं नगरसेवकांना उद्देशून जातीयवादी उद्गार काढल्याने उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायालयाच्या सुनावणी नंतर गुरुवारी रात्री उशीरा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला आहे.

आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, ६ जुलै रोजी रिपाइं, भारिप, पीआरपी, काँग्रेस पक्ष गटनेत्यांच्या दालनाला सील केले होते. याचा जाब विचारण्यासाठी रिपाइं गटनेते भालेराव हे आयुक्त निंबाळकर यांच्या दालनात गेले असता. त्यावेळी दोघात मोठा वाद झाला होता. त्या वादातूनच आयुक्तांच्या तोंडून जातीवाचक शब्द निघाले होते.

या प्रकरणी रिपाइं नगरसेवकांनी तब्बल ५ महिने पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही पालिका आयुक्त विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या विरोधात रिपाईचे जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक भगवान भालेराव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर कल्याण सत्र विशेष न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने महापालिका आयुक्त निंबाळकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्त निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणारे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तोटावर, तपास अधिकारी अविनाश काळदाते यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email