अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याण शाखा तर्फे पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याण शाखेने काल काश्मिर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेधार्थ आज शुक्रवार १५ फरवरी रोजी सकाळी बिर्ला महाविद्यालयात घोषणा बाजी करून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला तसेच कल्याण पूर्व मधील मॉडेल महाविद्यालयात बारावीच्या विदयार्थ्यांची तोंडी परीक्षा सुरू असताना सुद्धा बारावीची विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली दिली.
विद्यार्थी परिषद सरकार कडे मागणी करते की सरकारने लवकरात लवकर जैश- ए- मोहम्मद दहशतवादी संघटने वरती कारवाई करण्याची भूमिका घ्यावी व विद्यार्थी परिषद शहिद जवानांच्या कुटुंबियांन सोबत आहे.तसेच ह्या घटनेचे राजकारण करू नये. निषेधासाठी अ.भा.वि.प कल्याणजिल्हा संघटनमंत्री ज्ञानेश्वर पवार शहर मंत्री सुशांत शेलार,सहमंत्री तन्मय धर्माधिकारी,महाविद्यालय विद्यार्थी सहप्रमुख तेजस कोंडर, कल्याण शहर विद्यार्थिनीं प्रमुख मानसी जाधव,ज्ञानेश्वरी हजारे,गौरव गोवेकर,कमलेश सोनवणे,अपूर्व कोलते,शिवम किल्लेदार,सागर ढाने,अमोल शिंदे,सुशांत पवार,प्रतिक बदाने,आकाश लोहकरे,शुभम खैरे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.