अखिल भारतीय औषध संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा आ. जगन्नाथ शिंदे

( तेजस राजे )

शुक्रवारी आग्रा येथे झालेल्या अखिल भारतीय औषध संघटनेच्या निवडणुकीत आ. जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जगन्नाथ सखाराम शिंदे पॅनल विरुध्द सुरेश गुप्ता पॅनल अशी लढत झाली. या लढतीत आ. जगन्नाथ शिंदे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले असून सुरेश गुप्ता पॅनलचा दणदणीत पराभव झाला आहे.

आ. जगन्नाथ शिंदे यांची अध्यक्षपदाची ही चौथी वेळ असून निवडणुक प्रक्रियेद्वारे अध्यक्षपदी निवडुन येण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.

जगन्नाथ सखाराम शिंदे पॅनलमध्ये आप्पा उर्फ आ. जगन्नाथ शिंदे (महाराष्ट्र) यांनी अध्यक्षपदासाठी तर राजू सिंघल (मध्य प्रदेश) यांनी सचिवपदासाठी व के. के. सिल्वम् (तामिळनाडू) यांनी खजिनदारपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामध्ये आ. जगन्नाथ शिंदे विरुध्द ए. एन. मोहन यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होऊन आ. जगन्नाथ शिंदे यांना एकूण ५८७ पैकी ४०० विजयी मते मिळाली तर पराभूत उमेदवार ए. एन. मोहन यांना १८६ मते मिळाली असून एक मत रद्दे करण्यात आले.

सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत जेएसएस पॅनलचे विजयी उमेदवार राजीव सिंघल यांना एकूण ५८७ मतांपैकी ३४१ मते तर पराभूत उमेदवार सुरेश गुप्ता यांना २४२ मते मिळाली. यात चार मते रद्द करण्यात आली.

खजिनदारपदासाठी झालेल्या निवडणुकीत जेएसएस पॅनलचे विजयी उमेदवार के. के. सिल्वम् यांना एकूण ५८७वमतांपैकी ३८३व मते मिळाली तर पराभूत बिक्रम चौधरी यांना २०० मते मिळाली असून ४ मते रद्द करण्यात आली.

या निवडणुकीच्या निकालानंतर अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी कल्याणचे सुपूत्र आ. जगन्नाथ शिंदे पुन्हा एकदा अध्यक्षपदी विराजमान झाले असून कल्याणसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष आ. जगन्नाथ शिंदे यांचा कार्यकाल २०१७ ते २०२० एवढा असणार आहे. जे. एस. एस पॅनल प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल जालना जिल्ह्याचे रिटेल अॅन्ड होलसेल कॅमिस्ट असोसिएशनचे सचिव संजय बोबडे यांनी जे.एस.एस. पॅनलचे अभिनंदन केले.

शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत निवडणुक अधिकार म्हणून बिहारचे पी. के. सिंग यांनी काम पाहिले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email