अंमली पदार्थ विरोधी तसेच सोशल मीडियाच्या वापराबाबत प्रगती महाविद्यालयात जनजागृती

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवली पोलिस विभाग आणि झोन ३ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रगती महाविद्यालय व प्रगती माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्या सहकार्याने ईगल ब्रिगेड फाउंडेशन ने अंमली पदार्थ विरोधी व सोशल मीडियाचा कसा वापर करावा या विषयांवर डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयात जनजागृतीपर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक महाजन सरांनी बहुमोल सहकार्य केले. चित्रफितीच्या तसेच परस्पर सुसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात एक चांगली व वाईट परंतु आपण स्वतः ठरवायचं की त्याचा कसा वापर करायचा असं ईगल ब्रिगेड संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले. अंमली पदार्थ असोत किंवा सोशल मीडियाचा वापर असो अनेकवेळा आपण मजा-मस्ती म्हणून काही गोष्टी करतो परंतु त्याचे नंतर होणारे अनिष्ट परिणाम याची माहिती चित्रफितीद्वारे अधिक परिणामकारकपणे दाखवण्यात आली.  जवळ जवळ ५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी यावेळी अंमली पदार्थ सेवन न करण्याची तसेच इतर कोणी तसे करताना दिसत असल्यास त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करू अशी शपथही घेतली. डोंबिवलीती ल सर्व महाविद्यालयांमध्ये असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात पोलिस सब इन्स्पेक्टर प्रशांत मोरे, प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. पां. महाजन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या नूतन मॅडम, क्रीडाप्रमुख इंगळे सर तसेच ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर, अनुप इनामदार, स्वप्नील महाजन, ओजस ठोंबरे, समीर कांबळी, नितीश चांदसरकर, संजय गायकवाड अमेय देशपांडे, प्रगती माजी विद्यार्थी असोसिएशनचे सचिव राहुल नाले, सदस्य सायली परांजपे उपस्थित होते.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email