अंबाजोगाई तालुक्यात युवकाची आत्महत्या
अंबाजोगाई – नापिकी आणि आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त झालेल्या वीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथे उघडकीस आली आहे. त्तरेश्वर भारत गोमदे (वय २०) असे मयत युवकाचे नाव आहे. सततची नापिकी आणि त्यामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणी यामुळे तो मागील काही दिवसापासून त्रस्त होता.
अखेर याच नैराश्यातून त्याने आज शनिवारी पहाटे ५ वाजताच्या नंतर शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहित मिळताच युसुफवडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या टाण्यात देण्यात आला. याप्रकरणी पो.ना. जी.आर.नाईक पुढील तपास करत आहेत.
Please follow and like us: