अंबरनाथ तालुक्यातील एम आय डी सी च्या नोंदी कमी करण्याची मागणी

(म.विजय)

कल्याण – अंबरनाथ तालुक्यातील गावामधील शेतकऱ्यांच्या 7/12 वरील एम आय डी सी च्या नोंदी कमी करण्याची आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्रा द्वारे मागणी. अंबरनाथ तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळ लगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील 7/12वर किमान 15 ते 16 वर्षांपासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळ (MIDC) अशा नोंदी करण्यात आल्या आहेत ,त्यामुळे जमिनीवर शेतकरी कर्ज काढू शकत नाही ,जमीन विकसीत करता येत नाही अथवा विकताही येत नसल्याने तेथील शेतकरी हवालादिल झाला आहे ,अंबरनाथ तालुक्यातील गोरपे, आंभे ,खरड ,काकोळे ,शिरवळी या गावांतील या जमिनी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आसून स्थानिक भूमिपुत्रांच्या 7/12 वरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळ (MIDC) अशा नोंदी कमी करण्यातबाबत कल्याण पूर्वेचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी पत्रा द्वारे मागणी केली आहे ,यावेळी लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी आमदार गणपतशेठ गायकवाड यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.