अंबरनाथच्या सागर ज्वेलर्समध्ये जबरी चोरतब्बल ३ कोटींचं १० ते १२ किलो सोनं चोरीला गेल्याची भीती
( म विजय )
अंबरनाथच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकात सागर ज्वेलर्समध्ये आज जबरी चोरी झाली. यात चोरट्यांनी तब्बल ३ कोटींचं १० ते १२ किलो सोनं चोरून भीती व्यक्त होतेय. अंबरनाथ पूर्व भागात स्टेशनच्या अगदी समोरच महेंद्र जैन यांचं सागर ज्वेलर्स नावाचं दुकान असून दररोज दुपारी काही काळ हे दुकान बंद असतं. आज दुपारी हीच वेळ साधत चोरट्याने दुकानाच्या मागची ग्रील तोडून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातलं सर्व सोनं चोरून नेलं. हा सर्व प्रकार दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. यात जवळपास १० ते १२ किलो सोन्याचा समावेश असल्याची भीती व्यक्त होत असून त्याची किंमत किमान ३ कोटी रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जातंय. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनं व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून पोलीस सध्या चोरट्याचा शोध घेतायत.
Please follow and like us: