एसटीच्या वर्ग 1 व 2 अधिकारी पदाची लेखी परीक्षा 17 ,18 ,19 मे रोजी होणार…!

मुंबई दि.१७ – एसटीच्या विविध वर्ग 1 व 2 अधिकारी पदासाठी ऑनलाइन परीक्षा 17 ,18, 19 मे रोजी होणार असून या परीक्षेला ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत , त्या पात्र उमेदवारांची परीक्षेचीे प्रवेशपत्रे एसटी महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्यासंबंधीचा लघुसंदेश त्यांनी (उमेदवार)अर्जामध्ये नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर व भ्रमणध्वनी वर ( मोबाईलफोन) पाठवून देण्यात आलेले आहेत. तरी उमेदवारांनी प्रवेशपत्र www.msrtcexam.in या संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावेत.

तसेच उमेदवारांनी परीक्षेच्या केंद्रावर किमान दिड तास अगोदर हजर रहावे. सदर परिक्षा on-line पध्दतीने घेण्यात येणार असून, 100 प्रश्नांच्या या परिक्षेत प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. परिक्षेचा कालावधी दीड तास असणार आहे. अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र अजुनी प्राप्त झालेले नाहीत , तसेच काही शंका असल्यास 18005722005 या निःशुल्क दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा. तसेच उमेदवारांनी कोणत्याही अवैध प्रलोभन अथवा अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे परिक्षा दयावी,असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email