जागतिक जैवइंधन दिवस १० ऑगस्ट २०१८ ला
नवी दिल्ली, दि.०९ – पारंपारिक इंधनाला पर्याय म्हणून अजैविक इंधनाचे महत्व आणि जैवइंधन क्षेत्रात सरकारचे विविध प्रयत्न याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० ऑगस्ट हा दिवस जागतिक जैवइंधन दिवस म्हणून साजरा केला जातो. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय गेल्या तीन वर्षांपासून हा दिवस साजरा करत आहे.
यानिमित्त उद्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात कार्यक्रम होणार असून उद्घाटन सत्राला पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, शास्त्रज्ञ, जैवइंधन क्षेत्रातील उद्योजक, विज्ञान-अभियांत्रिकी व कृषी क्षेत्रातील विद्यार्थी, खासदार, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. इथेनॉल, बायो-डिझेल, बायो-सीएनजी अशा विविध विषयांवर कार्यक्रमात चर्चासत्रं होणार आहेत.
Please follow and like us: