कल्याणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या
डोंबिवली दि.२७ – कल्याण मधील एका महिला डॉक्टरने राहत्या घराच्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिम येथे घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून खडकपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत या प्रकरणी नोंद केली असून या डॉक्टरने आत्महत्या का केली याचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :- कल्याण- डोंबिवलीत घरफोडीचे सत्र सुरूच
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील महावीर हाईट्स या हायप्रोफाईल इमारती मध्ये डॉक्टर प्रणव कुलकर्णी व डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह गेल्या सात ते आठ वर्षांपासून राहतात. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी इमारतीच्या गच्चीवर गेल्या होत्या. तेथून त्यांनी खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत या प्रकरनाची नोंद केली असून कुलकर्णी यांनि आत्महत्या का केली याबाबत तपास सुरू केला आहे.