दीड हजारांची लाच स्वीकारताना महिला पोलीस हवालदार एसीबी च्या जाळ्यात

(श्रीराम कांदु)

पुणे दि.०४ :- दुकान खाली करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई आज, बुधवारी (दि. ४) करण्यात आली आहे. संगीता विनोद गायकवाड (वय ४८) असे पोलीस हवालदार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय इसमाने तक्रार दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ६० फुटी डी पी रोड, पिंपळे गुरव येथे भाडेतत्त्वावर दुकान होते.

हेही वाचा :- मनसेच्या दणक्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने जारी केला नवीन व्हिडीओ,

दुकानाचा करार संपल्यानंतर तक्रारदारांनी दुकानाचा ताबा सोडला नाही. याबाबत मूळ मालकाने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड यांच्याकडे होता. गायकवाड यांनी भाडेकरू दुकानदाराकडे दुकान खाली करण्यासाठी वाढीव मुदत देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले.

हेही वाचा :- मनसे तर्फे पाक बांगलादेशमधील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या माहिती देणाराना ५,५५५ बक्षीस

त्यातील दीड हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे, पोलीस कर्मचारी अंकुश माने, श्रीकृष्ण कुंभार, चालक जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email