महिला पोलीस उपनिरीक्षकाची चौथ्या मजल्यावरून उडी

लैंगिक छळ प्रकरणी कारवाई न झाल्याने उचलले पाऊल

उस्मानाबाद – लैंगिक छळ प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाई न केल्यामुळे उस्मानाबादच्या त्या महिला पोलीस उपनिरीक्षकांने शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना सोलापूरला हलवण्यात येत आहे. मनीषा गिरी असे या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. मार्च महिन्यात उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्याच पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी त्यांचा लैंगिक छळ केला होता. तशी त्यांनी २८ मार्च रोजी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती. त्यानंतर गिरी यांची उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसापासून या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी गिरी यांच्यावर दबाब आणत होते, तसेच स्वतःला पत्रकार म्हणून घेणारा एक दलाल गिरी यांच्यावर दबाब आणत होता तर एक भुरटा पत्रकार त्याच्या चार पानी पेपरमध्ये खोट्यानाट्या बातम्या छापत होता, त्यातून गिरी यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आम्ही बोलणाच्या मन:स्थितीमध्ये नाहीत, पण या दोन भुरट्या पत्रकारामुळे मनीषा गिरी यांनी उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल होतो, याकडे लक्ष वेधले आहे. मनीषा गिरी या येडशी रोडवर एका खासगी ठिकाणी राहत होत्या. ती चार मजली बिल्डिंग आहे..शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता त्यांनी याच ठिकाणाहून चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्याचे हात पाय फॅक्चर झाले असून डोक्यालाही मार लागला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Source – ABI News

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email