साथीचे रुग्ण वाढत असताना पालिकेच्या दोन्ही रुग्णालयात असंतोषाचा स्फोट होणार ?

डोंबिवली दि.११ :- पावसाळा सुरू होताच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात  रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पावसामुळे मलेरिया, डेंग्यू, कावीळ हे साथीचे आजार वाढत असल्याने बाल रोगतज्ञ, सर्जन, सर्वसाधारण डॉक्टर याची तातडीने गरज आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने ठोक वेतनावर डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच हीच अवस्था कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयाची असून अति ताणामुळे डॉक्टर्स राजीनामे देण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा :- कोपर पूल 28 ऑगस्ट पासून संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देश

डॉक्टरांमध्ये तीव्र असंतोष असून त्याचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत. शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील सूत्रांच्या माहितीनुसार रुग्णालयात 29 वैद्यकीय अधिकारी असून त्या पैकी 16 कायम तर 09 कंत्राटी अधिकारी आहेत नवीन डॉक्टर्स कमी वेतनामुळे येण्यास तयार नाहीत. तज्ञ डॉक्टरला इतर हॉस्पिटल प्रमाणे 60-65 हजार रुपये वेतन देण्याची सूचना करण्यात आली. सध्या अवघे 40-42हजार मासिक वेतन दिले जात असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिलांचे आजार, त्वचारोग, डोळ्यांचे विकार, रक्तदाब आणि सर्दी-ताप आदींसाठी गोर-गरीब रुग्णांची गर्दी होत असते.  तर कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पण अवघे 2 डॉकटर्स कामाच्या अति ताणामुळे त्रस्त आहेत.

हेही वाचा :- आगरी कोळी कराडी समाजाच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी होणार नवीन संघटना स्थापन.

शास्त्रीनगर रुग्णालयात अद्याप स्त्रीरोग, बालरोग, सर्जन, रेडीओलॉजीस्ट व सोनोलॉजीस्ट, पॅथॉलॉजीस्ट, फिजीशीयन अशा 13 तज्ञ डॉक्टरांची गरज आहे. याशिवाय सहाय्यक प्रयोगशाळातंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टाफनर्स, लिपिक, कक्षसेवक, आया, पुरुष-सफाई कामगार, वाहनचालक अशा सुमारे 150 पदे रिकामी आहेत अशी कबुली डॉ चंद्रशेखर सावकारे यांनी दिली. तर रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या डॉ अश्विनी पाटील यांनी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली असून वरिष्टकडे अहवाल पाठवला असल्याचे सांगितले महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात अपुऱ्या डॉक्टर संख्येमुळे असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत. 

काश्मीर में स्थित सामन्य करने के केन्द्र् सरकार के सार्थक प्रयास, और सफलता भी.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email