डोंबिवलीच्या बत्तीगुलचा प्रश्न सुटणार ?
Hits: 0
डोंबिवली दि.०७ :- पूर्वेकडे असलेल्या अनेक भागात वारंवार बत्तीगुल होण्याच्या त्रासाने नागरिक हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे यांनी पाठपुरावा सुरू केल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या तातडीच्या बैठकीत हा प्रश्न सोडविण्यासाठी विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासदार निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. डोंबिवलीतील राजेंद्र प्रसाद रोड, 4 रस्ता, रघुवीर नगर, कस्तुरी प्लाझा, रामनगर, मनोरमा सोसायटी, चंद्रमा सोसायटी या परीसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून घडत आहेत.
हेही वाचा :- कल्याणमध्ये गॅस सिलेंडर स्फोटात मानवीवस्ती थोडक्यात बचावली
वारंवार बत्तीगुल होत असल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. यातून नागरीकांची मुक्तता होण्यासाठी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे हे प्रयत्नशील आहेत. पण सदर कामात महाराष्ट्र विज वितरण कंपनीकडून खूपच दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ही बाब खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये पत्रकार दिवस साजरा
खासदार डॉ. शिंदे यांनी याबाबत तातडीने जिल्हा नियोजन खात्याकडून यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून सदर कामास यामुळे गती येणार आहे. याबाबत विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला व सदर काम पुढील महिन्याच्या आत पूर्ण होईल अशी ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीस खासदार डॉ. शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, नगरसेवक दिपेश म्हात्रे व शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे, तर महावितरण कंपनीतर्फे विभागीय संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधिक्षक अभियंता सुनिल काकडे, धर्मराज शिंदे, शैलेंद्र राठोड, प्रवीण परदेशी व अतिरीक्त कार्यकारी अभियंता कलढोण उपस्थित होते.