कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख केल्याच्या निषेधार्थ निदर्शने…
{म.विजय}
मुंबई दि.०८ :- सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज दुपारी १२ वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी दिली.
हेही वाचा :- Live news ; अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आला तर बोलणी सुरू होतील – संजय राऊत
सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून याचा निषेध म्हणून आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सदरबाबीचा निषेध करण्यासाठी आज सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या मालाड येथील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.