प्रदूषण नियंत्रण मंडळाला कुणी घर देता का घर ?

{श्रीराम कांदु}

डोंबिवली दि.०५ :- राष्ट्रीय हरित लवादाने देशातील 100 औद्योगिक विभागाची सर्व समावेशक पहाणी केली त्यामध्ये महाराष्ट्रातील 09 क्षेत्राचा समावेश आहे व डोंबिवलीचा क्रमांक 40 वा आहे. डोंबिवलीतील प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याणचे उप प्रादेशिक कार्यालय डोंबिवलीत हलवण्याचे निर्देश देण्यात आले. त्या नंतर डोंबिवली औद्योगिक विकास विभागातील ऐका दालनात कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी कल्याण येथे व मोजके अधिकारी व कर्मचारी डोंबिवलीत असा तात्पुरता कारभार सुरू आहे यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ जागेच्या शोधात असून भाडे तत्वावर जागेचा शोध सुरू असून जमल्यास प्लॉट घेऊन स्वतंत्र कार्यालय थाटण्यात येणार आहे त्यामुळे मंडळाची अवस्था ” कुणी घर देता का घर ?”अशी झाली आहे.

हेही वाचा :- २३ शेल कंपन्यांचा समावेश असलेल्या ७८९६ कोटी रुपयांचे बनावट चलन बनवणारे मुख्य रॅकेट उघडकीस आले

डोंबिवलीतील प्रदूषणासादर्भात गेली अनेक वर्षे कल्याणचे कार्यालय डोंबिवलीत हलवण्याची मागणी डोंबिवलीकर करत होते कारण औद्योगिक विभाग डोंबिवलीत व कार्यालय कल्याण अशी अवस्था होती. प्रदूषणासादर्भात तक्रार कल्याण येथे जाऊन करायची व अधिकारी पण कल्याण येणार अशी स्थिती होती. यामुळे डोंबिवलीतच कार्यालय हवे अशी मागणी उद्योजक ,नागरिक करत होते त्याची दखल राज्य शासनाने घेतली. प्रदूषणाची समस्या निर्माण झाल्यास कल्याण येथे संपर्क करणे कठीण होत अखेर राज्य शासनाने नागरिकांच्या मताचा विचार करून डोंबिवली येथे कार्यालय सुरू करण्यास मान्यता दिली.

हेही वाचा :- दीड हजारांची लाच स्वीकारताना महिला पोलीस हवालदार एसीबी च्या जाळ्यात

सध्या प्रदूषण मंडळाचे मुख्य कल्याण विभागाचे कार्यालय कल्याण येथे असून सर्व कर्मचारी तिथेच बसत्तात डोंबिवलीत सध्या काही अधिकारी व मोजके कर्मचारी डोंबिवली औद्योगिक मंडळाच्या कार्यालयात बसतात विशेष म्हणजे प्रदूषण मंडळाचे कार्यालय कुठे आहे ,अधिकारी कुठे बसले आहेत हे मंडळाच्या कर्मचाऱयांना पण माहीत नव्हते ,प्रदूषण मंडळ कार्यालय असा साधा बोर्ड पण अजून लावण्यात आलेला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार जे अति धोकादायक कारखाने आहेत. त्या पैकी मेट्रोपोलिटीन एक्झीम हा कारखाना जळून खाक झाला. तर दोन कारखान्यांना या पूर्वीच बंदची नोटीस दिली आहे. हे कारखाने जे अति धोकादायक आहेत ते तेथील उत्पादन जीवितास धोकादेणारे असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :- मनसेच्या दणक्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने जारी केला नवीन व्हिडीओ,

डोंबिवलीतील प्रदूषण बरेच नियंत्रणात असून सांडपाणी प्रक्रिया केलेले प्रदूषित पाणी बंद पाईपमार्फत ठाकुर्ली खाडीत सोडण्यात येणार असून 2022 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला 5 कारखान्यांपैकी घरडा व हॉकटेल हे दोन कारखाने आता अति धोकादायक असून ते सर्व काळजी ,ट्रेनिंग घेत असल्याचा दावा करण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email