जेव्हा क्रिकेट संघाच्या जर्सीवर झळकते लाव रे तो व्हिडीओ !

पुणे दि.२१ – राज ठाकरेंनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेत भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. भाजप- शिवसेना युतीची व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी पोलखोल केली होती. त्यावेळी त्यांच्या प्रत्येक सभेत राज ठाकरे व्हिडीओ लावून युतीच्या योजनांची, दाव्यांची पोलखोल करत होते. त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डायलॉग भलताच फेमस झाला होता. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) वतीने नुकताच नवनिर्माण करंडक ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत संघांना देण्यात आलेल्या जर्सीवर राज ठाकरेंच्या फोटो खाली लाव रे तो व्हिडीओ हा डायलॉग लिहीण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांमध्ये या जर्सीची भलतीच चर्चा होती.  लोकसभेच्या प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेतल्या. मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नसला तरी भाजप शिवसेना सत्तेत येऊ नये म्हणून ठाकरे यांनी मतदारांना युतीला मतदान न करण्याचे आवाहन केले.

ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत स्क्रिनवर भाजपाची पोलखोल करणारे व्हिडीओ दाखविले. ते ज्या पद्धतीने लाव रे व्हिडीओ हे वाक्य उच्चारत होते, ते वाक्य तरणाईमध्ये भलतेच फेमस झाले. तरुणांकडून या वाक्याचा वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. नुकताच पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून नवनिर्माण करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातून 39 संघ सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक संघाला वेगवेगळ्या रंगाची जर्सी देण्यात आली होती. परंतु या प्रत्येक जर्सीवर राज ठाकरेंचा फोटो आणि त्या खाली लाव रे तो व्हिडीओ असे वाक्य लिहीण्यात आले होते. अशा प्रकारे जर्सीवर राज ठाकरेंचा डायलॉग आल्याने ही जर्सी चर्चेचा विषय ठरली होती. याबाबत बोलताना मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, तरुण वर्ग हा राज ठाकरे यांचा मोठा चाहता आहे. राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने भाजप-शिवसेनेच्या फसव्या योजनांची चिरफाड केली आणि त्यासाठी पुरावा म्हणून व्हिडिओ दाखवले ही गोष्ट तरुणांना खूप आवडली. त्यामुळे तरुण खेळाडूंच्या मागणी वरूनच आम्ही अशा प्रकारच्या टी-शर्टची छपाई केली आहे. दरम्यान या स्पर्धेत पुण्यातील स्वारगेट भागातील श्री इलेव्हन या संघाने विजय मिळवला. त्यांना चषक आणि 51 हजार रुपयांचे पारिताेषिक देण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email