‘निवडून देताना “ते ” व समस्या सोडवायला आम्ही ,हे सूत्र जमणार नाही ‘ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे
डोंबिवली दि.१५ – रेल्वे प्रवाशाचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपनगरी रेल्वे प्रवासी संघटणासोबत मध्य रेल्वेचे प्रबंधकाची भेट घेतली होती पण गेल्या दीड वर्षात एकही प्रश्न सोडवण्यास ते यशस्वी झाले नाहीत या बद्दल आज प्रवासी संघाने भेट घेऊन त्याचे लक्ष वेधले मात्र त्यांनी ‘निवडून देताना “ते ” व समस्या सोडवायला आम्ही ,हे सूत्र जमणार नाही ‘असे उत्तर दिले डोंबिवलीतील २ प्रभाग कार्यालयाचे उद्घाटन निमित्त त्यांनी डोंबिवलीचा धावता दौरा केला तेव्हा त्यांनी उपनगरी प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष अनिकेत घमडी यांनी भेट घेऊन त्यांना या संदर्भात लक्ष वेधले असता राज ठाकरे यांनी वरील उत्तर दिले.
हेही वाचा :- आज राज ठाकरे डोंबिवलीत
५ ओक्टॉबर १७ रोजी राज ठाकरे यांनी रेल्वे प्रवासी संघटणासोबत मध्य रेल्वेच्या प्रबंधकाची भेट घेतली होती. महिला स्पेशल ट्रेन सुरू करणे ,ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रेन मध्ये प्रवेश करताना रॅम्प लावणे व ५ व ६ ट्रेक सुरू करणे असे प्रश्न मांडले होते व वारंवार या संदर्भात संपर्क करू असे ठोस आश्वासन दिले होते पण दीड वर्षात काहीच झाले नाही याबद्दल राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी वरील प्रमाणे उत्तर दिले या उत्तरामुळे प्रवासी संघाने नाराजी व्यक्त केली तुमचे खासदार काय करतात हा प्रश्न त्यांनी सोडवायचा आहे. पलावा येथील राजू पाटील यांच्या कार्यालयात आज सकाळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे कार्यकर्ते अवाक झाले या बद्दल तपासे यांना विचारले असता त्यांनी शरद पवार यांचा निरोप दिला असे सांगितले व सदिच्छा भेट घेतली असेही सांगितले.