शिवसेनेत स्किल पाहून इनकमिंग : आदित्य ठाकरे

औरंगाबाद दि.१८:- शिवसेनेत सध्या इनकमिंग सुरु आहे, मात्र शिवसेनेत स्किल पाहून इनकमिंग केलं जातं, जेणेकरुन त्यांचा महाराष्ट्राला उपयोग होईल असे शिवसेना नेते युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांनी सांगीतले. नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशावर प्रश्न विचारला असता आदित्य यांनी हे उत्तर दिले. आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने काल औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

हेही वाचा :- कल्याण स्टेशन परिसरात रिक्षाचालकाची मनमानी; प्रवासी आणि रिक्षाचालकात वाद

काल त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन जन आशीर्वाद यात्रेच्या प्रतिसादाबद्दल माहिती दिली. निवडणूक लढवण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, “जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी मतदारांचे आभार मानत आहे. त्यांची मने जिंकत असताना मी विधानसभा निवडणूक लढायला हवी की नको? याविषयी जनतेची मतं जाणून घेत आहे. लोकांचा आदेश घेऊनच मी पुढे जाणार आहे. लोकांनी लढ म्हटले तरच मी निवडणूक लढणार”

हेही वाचा :- दुसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाबरोबरच तिसऱ्या पुलाचेही काम होणार सुरु

“संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मला शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागदेखील आवडतो. वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्‍त केली आहे. त्यापूर्वीही मालेगाव, दिग्रस मतदारसंघातून मी विधानसभा लढवण्याची तिथल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्‍त केली आहे”

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email