कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात दर मंगळवारी व चौथ्या शनिवारी पाणी पुरवठा 24 तास बंद
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत प्रत्येक मंगळवारी पाणी पुरवठा चोवीस तास बंद रहाणार आहे तर 1 जानेवारी पासून प्रत्येक मंगळवार व चौथा शनिवार पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 पर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे पाटबंधारे विभागाने 24 तास असणारी पाणी कपात 30 तास केली आहे मात्र प्रत्येक मंगळवारी 30 तास पाणी कपात केल्यास पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची भीती असल्याने आठवड्याचे सहा तास मिळून चौथ्या शनिवारी २४ तास पाणी पुरवठा बंद असणार आहे अशी माहिती जलाभियंता राजीव पाठक यांनी दिली.
एम आय डी सी भागातील 27 गावे,उद्योजक ,निवासी भाग यांना मात्र दर गुरुवारी सायंकाळी 6 ते शुक्रवारी रात्री 12 असे 30 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे अशी माहिती औद्योगिक विकास मंडळाने दिली. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पुरेसा साठा करून ठेवावा असे आवाहन राजीव पाठक यांनी केले आहे
Please follow and like us: