देशातील महत्वाच्या ९१ धरणांमध्ये १८ टक्के जलसाठा उपलब्ध
नवी दिल्ली, दि.२२ – देशातील महत्त्वाच्या ९१ धरणातल्या जलसाठ्यांमध्ये २१ जून २०१८ रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये २९.६६८ अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते १८ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील साठ्याच्या १०१ टक्के इतका हा साठा आहे.
या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता १६१.९९३ अब्ज घनमीटर इतकी आहे. ९१ पैकी ३७ जलसाठ्यांवर ६० मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये २७ धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या ३.९५ अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
Please follow and like us: