देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 4 टक्के वाढ
नवी दिल्ली, दि.१९ – देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 16 ऑगस्ट 2018 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये 84.743 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 52 टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील साठ्याच्या 112 टक्के इतका हा साठा आहे.
हेही वाचा :- लैंगिक शोषणाची खोटी तक्रार
या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 161.993 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
हेही वाचा :- खंडणीसाठी चक्क एका म्हशीचे अपहरण
पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 11.05 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
हेही वाचा :- हरिद्वार येथे गंगा नदीमध्य़े आज माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं अस्थिविसर्जन करण्यात आले
ओदिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश-तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या वर्षी एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.