बृहन्‍मुंबईतील १० टक्‍के पाणीकपात पुढे ढकलली

Hits: 0

मुंबई दि.०२ :- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्‍ती कामामुळे मुंबईत ३ ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत नियोजित १० टक्‍के पाणीकपात जाहीर करण्‍यात आली होती, ती आता शनिवार, ७ ते शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत होणार आहे. पिसे उदंचन केंद्रात न्‍यूमॅटिक गेट सिस्टिमची दुरुस्‍ती करण्‍यात येणार आहे. त्‍या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार, ३ ते सोमवार, ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत १० टक्‍के पाणीकपात करण्‍यात येणार होती.

हेही वाचा :- शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाचे काम एक वर्षानंतर अखेर पूर्ण

त्‍याऐवजी ही पाणीकपात आता शनिवार, ७ ते शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत करण्‍यात येणार आहे. पाणीकपातीच्‍या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. तथापि, दुरुस्‍ती कामाची आवश्‍यकता लक्षात घेता, नागरिकांनी कपात कालावधीत सहकार्य करावे तसेच एक दिवस आधी पुरेसे पाणी साठवून ठेवावे असे पालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.