मराठवाड्यात १ ऑक्टोबरपासून पाणीसंकट मांजरा धरणातून होणारा पाणी पुरवठा बंद

Hits: 0

लातूर दि.१८ :- येत्या ०१ ऑक्टोबरपासून अंबाजोगाई शहरासह बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना करण्यात येणारा पाणी पुरवठाबंद करण्यात येणार आहे. कारण पावसाअभावी लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरणातील जलसाठा अटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता लातूरला १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे टँकरवर तसेच रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.

हेही वाचा :- kalyan ; रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईस सुरुवात

या धरणातून लातूर, अंबाजोगाई सारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यावर्षीही पावसाळा संपत आला तरी धरणक्षेत्रात पाण्याचा एक थेंबही जमा झालेला नाही. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेला सर्वच पाणी पुरवठा अडचणीत आला आहेत.मराठवाड्यातील पाणी संकट लक्षात घेत अडचणींवर मात करण्यासाठी मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धरणातून होणारा पाणी पुरवठा 1 ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

हेही वाचा :- शिवसेनेत स्किल पाहून इनकमिंग : आदित्य ठाकरे

यापुढे प्रत्येक घरी केवळ 200 लिटर पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.लातूर महापालिकेचे 600 टँकरचे नियोजन लातूर महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी 600 टँकरचे नियोजन केले आहे. शहरातील गरजेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल, असं महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?

Leave a Reply

Your email address will not be published.