बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान

मुंबई दि.०९ :- बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी ९ जानेवारीला मतदान; तर १० जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

हेही वाचा :- बलात्कार प्रकरणांसाठी जलदगती न्यायालय

मदान यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे १६ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत दाखल करता येतील. २२ डिसेंबर २०१९ रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. २४ डिसेंबर २०१९ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २६ डिसेंबर २०१९ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना २७  जानेवारी २०१९ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. ९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७३:० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १० जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

हेही वाचा :- बलात्कार प्रकरणांसाठी जलदगती न्यायालय

पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: नाशिक- २२अ आणि २६अ, मालेगाव- १२ड, नागपूर- १२ड, लातूर- ११अ, पनवेल- १९ ब आणि बृहन्मुंबई- १४१.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email