उरण मध्ये मतदार जनजागृत अभियानाला पथानाट्याद्वारे उत्साहात सुरुवात..

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.२७ – लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाहीला पूर्णत्व लाभत नाही .भारतीय लोकिशाही अधिक व बळकट करण्याकरीता मतदार म्हणून लोकसहभाग वाढला पाहिजे. या जाणीवेतून उरण मध्ये पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे.

मा. डॉ. श्रीमती दिपा भोसले,

उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी १९० उरण विधानसभा मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनानुसार मा. तहसिलदार श्रीमती कल्पना गोडे यांच्या नियोजनानुसार मतदार जागृती अधिकारी संतोष पवार यांच्या निर्देशनाखाली व तू. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे विद्यार्थ्याच्या सहभागातून साकारलेल्या ‘निवडणूका आल्या आता निवडणूका आल्या’ या पथनाट्यातून मतदार जनजागृती अभियानाला वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदान करताना कोणत्याही भितीपोटी, लालसेपोटी मतदान करणार नाही तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत अशी शपथ घेतली.या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सांगळे सर, संतोष पवार सर,प्रा-दिनेश सासवडे सर यांनी लोकशाही आणि मतदारांची जबाबदारी या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पथनाट्यात सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक आर.पी. ठाकूर सर याचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,सेवक वर्ग तसेच उरण तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. दुपारी ३.०० वा. आवरे ता. उरण येथील भैरवनाथ मंदिरामध्ये हे पथनाट्य सादर करण्यात आले. त्यावेळी आवरे गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरीकांनी सध्याची परीस्थितीचे हुबेहुब विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून सादर केली आणि उत्तम प्रबोधन केल्या बद्दल विद्यार्थ्याचे सर्वांनी कौतुक केले.या पथ नाटयामुळे खूप मोठ्या प्रमाणात मतदान जणजागृती होणार असल्याने विविध सामाजिक संस्था, संघटनेनेहि या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email