लष्कर प्रमुखांचा अमेरिका दौरा

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत 2 ते 5 एप्रिल दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात लष्करी सहकार्य वृद्घिंगत करण्यासाठी जनरल बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ अमेरिकेच्या सशस्त्र दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात ते वेस्ट पॉइन्ट इथल्या लष्करी अकादमी आणि कन्सास इथल्या जनरल स्टाफ कॉलेजला भेट देतील. अमेरिकेचे लष्कर प्रमुख जनरल मार्क मिले आणि जनरल जोसेफ डनफोर्ड यांच्याशी परस्पर सहकार्याच्या मुद्यांवर ते चर्चा करतील. या दौऱ्यामुळे धोरणात्मक संबंध दृढ होण्याला चालना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.