२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व मालमत्ता करांबाबत ग्रामस्थांचा संघर्ष सुरू

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.३० :- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतून कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील २७ गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. विकास तर सोडाच या गावांना मुलभूत नागरी सुविधाही या भ्रष्ट आणि नियोजनशून्य महापालिकेमार्फत पुरविण्यात आल्या नाहीत. परंतु मालमत्ता कर मात्र १० पटीने वाढविण्यात आले. या सगळ्याचा जाहीर निषेध म्हणून २७ गावांतील हेदुटणे गावात सभा झाली. या सभेत समस्त महिला, तरूण, अबाल-वृद्धांसह महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. सन १९८२ साली विकासाच्या मुद्द्यावर कल्याण तालुक्यातील २७ गावे कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. परंतु विकास तर सोडाच या गावांतील गुरा-ढोरांच्या गोठ्याला आणि राहत्या घरालाही सारखेच कर आकारण्यात आले. या निर्णयांच्या विरोधात २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

हेही वाचा :- Kalyan ; शॉट सर्किट मुळे लागली आग जीव वाचविण्यासाठी पहिल्या मजल्यावरुन उडी

धडक मोर्चाद्वारे आम्हाला आमचा न्याय मागावा लागेल, असा इशारा सर्व पक्षिय युवा मोर्चासह आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाने दिला आहे. स्थानिकांच्या खासगी जामिनींवरील आरक्षण व वाढत्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर २७ गावे महापालिकेतून वगळून २००२ रोजी ग्रामपंचायती स्थापन झाल्या. या ग्रामपंचायतींच्या ठरावाच्या विरोधात जाऊन शासनाने १ जून २०१५ रोजी ही गावे पुन्हा या भ्रष्ट व नियोजन शून्य महानगरपालिकेत समाविष्ट केली. याही वेळी पुन्हा विकासाचे गाजर दाखविण्यात आले आणि या गावांचा विकास झाला नाही. पण या २७ गावांत मालमत्ता कर मात्र १० पटीने वाढविण्यात आले. यावर दंड व शास्ती वेगळीच लादण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्व पक्षिय युवा मोर्चा संघटनेचे प्रमुख संघटक तकदीर काळण, दिलीप पाटील, रूपेश पाटील यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या गावांत ग्रामपंचायतीप्रमाणे सुद्धा सुविधा पुरविल्यात नाहीत. आरोग्य केंद्र, शाळा आजही जिल्हा परिषदेअंतर्गतच आहेत. शिवाय जेव्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रश्न उपस्थित केला जातो.

हेही वाचा :- धुळ्यामध्ये भीषण अपघात ७ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

तेव्हा २७ गावे केव्हाही महापालिकेतून वगळण्यात येतील, अशी धमकी देण्यात येते. गावे वेगळी होणारच आहेत. शिवाय या गावांमध्ये महापालिका प्रशासनामार्फत कोणत्याही मुलभूत सुविधा न पुरवल्याने व मालमत्ता कर आकारणी करताना कोणतेही निकष न लावता कर आकाराणी करत असेल तर आम्ही महापालिकेला मालमत्ता कर का भरावा ? २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा विषय शासन तसेच न्यायालयीन दरबारी अनिर्णित आहे तोपर्यंत या गावांमध्ये ग्रामपंचायत दराप्रमाणे मालमत्ता कर आकारणी करावी, अशीही मागणी या सभेत ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांची मागणी नसताना ०१ जून २०१५ पासून २७ गावे कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. गावे महापालिकेत समाविष्ट करताना या गावांना मुलभूत नागरी सुविधा पुरवून नियोजनबद्ध विकास करण्याचे ठरले. परंतु तसे न होता या गावांतील फक्त मालमत्ता दहापट कर आकारणी केली.

हेही वाचा :-  Dombivali ; बेडरूममधील पलंगावर विषारी सापाला पाहून कुटूंबाची उडाली झोप

त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला विरोध करताना २७ गावांची विकास नियंत्रण नियमावली लागू करून २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे २७ गावांच्या बोडक्यावरचा ग्रोथ सेंटर बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप सर्व पक्षिय युवा मोर्चासह आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाने केला आहे. या जाहीर बैठकीत उपस्थित सर्व नागरीकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेविरोधात असहकाराचे बंड पुकारले. बैठकीत उपस्थित हेदुटणे ग्रामस्थांनी हात वर करून व नंतर लेखी स्वरूपात एकमताने ठराव पास केला. जोपर्यंत २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिके बाबतचा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत नियमबाह्य आकारण्यात येत असलेले मालमत्ता कर ग्रामपंचायत दराप्रमाणे आकारावेत. अन्यथा महापालिकेवर ऐतिहासीक ठरेल असा महिला, तरूण, अबाल-वृद्धांसह धडक मोर्चा काढण्यात येईल, असाही इशारा सर्व पक्षिय युवा मोर्चा संलग्न आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या सभेत बोलताना दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email