विजय दिनी सह्याद्रि प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता इतिहासाला दिला उजाळा.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.११ – उरण तालुक्यात समुद्र किनारी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्य द्रोणागिरी किल्ल्याचा आज २८० वा विजय दिन.१० मार्च १७३९ रोजी सरखेल मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून स्वराज्यात घेतला. उरण तालूक्याच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार असलेला द्रोणागिरी किल्ला जिंकून आज २८० वर्षे पूर्ण झाली.

हेही वाचा :- महिलांचा आत्मसन्मान करणे आपले कर्तव्य आहे – मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे

त्या दिवसाचं औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान उरण तर्फे आज दि १० मार्च रोजी सकाळी द्रोणागिरी किल्ल्यावर विजयदिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम गडपूजन व ध्वज पूजन करण्यात आले.गडावरील दारूच्या बाटल्या व प्लास्टिकचा कचरा उचलून गडस्वच्छता करून किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.यावेळी सह्याद्रि प्रतिष्ठानचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email