ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे दु:खत निधन
मुंबई दि.३० :- शोले चित्रपटातील ‘कालिया’ ही छोटीशी भूमिका अजरामर केलेले ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयातून त्यांना दोनच दिवसांपूर्वी घरी आणले होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शोले, अंदाज अपना अपना यासह सुमारे ३०० हून अधिक हिंदी, मराठी, गुजराती मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.
हेही वाचा :- “संगीत क्षेत्रातील चंद्रमा लता” पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन
खोटे यांची ‘शोले’ सिनेमातली कालियाची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यातील ‘सरदार मैने आपका नमक खाया है’ हा संवाद तसेच अंदाज अपना अपना मधील ‘गलती से मिस्टेक’ हा संवाद अजूनही लोकप्रिय आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिकाही अतिशय उत्तमपणे वठवली होती. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या.