केरळमधल्या तीन टोल नाक्यावरचे शुल्क माफ

नवी दिल्ली, दि.२२ – केरळमधली अभूतपूर्व पूरपरिस्थिती लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केरळमधल्या तीन टोल नाक्यावरचे शुल्क माफ केले आहे. त्रिसूर जिल्ह्यातल्या पलीक्करा, पलक्कड जिल्ह्यात पांपापल्लम आणि कोचीन जिल्ह्यातल्या कुबालम् जकात नाक्यांचा यात समावेश आहे.

हेही वाचा :-केरळमधल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी रेल्वेची सर्वतोपरी मदत

गेल्या आठवड्यापासून ही शुल्क माफी सुरू झाली असून या आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजे २६ ऑगस्टपर्यंत ही माफी सुरू राहणार आहे.अलुवाजवळ अभूतपूर्व पुरामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्ग ५४४ सह राज्यातले अनेक महामार्ग जलमय झाले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email