उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास…

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10.40 वाजताच्या सुमारास पीडितेचे निधन झाले. बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला गुरुवारी सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा :- Dombivali ; पोलिसांचा पीडितेला धक्कादायक सल्ला ‘तो’ पुन्हा तुमच्याकडे आला की बोलवा !

त्यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले. सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला.दरम्यान, 3 डिसेंबर रोजी आरोपी जामीनावर सुटले आणि मे.कोर्टात सुनावणीसाठी जाणाऱ्या पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.