Dombivali ; अनधिकृत बाधण्यात आलेल्या इन्फोसिस सिस्टीम प्रा.ली. इमारतीला सील ठोकले
Hits: 0
डोंबिवली दि.०३ :- मानपाडा रस्त्यावरील वजन काटा जवळ आय टी पार्कसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तळ अधिक ३ मजले बांधकाम परवानगी न घेता बांधण्यात आले होते. ‘सायबर इन्फोसिस सिस्टीम प्रा. लि.’ ने हे अनधिकृत बांधकाम केले ते मंगळवारी ओद्योगिक विभागाच्या प्रादेशिक विभागाने सील ठोकून ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :- Video ; बांधकाम सुरू असलेल्या मोटार ब्रिजवरून फाशी लावून आत्महत्याचा प्रयत्न
ओद्योगिक विभागातील सूत्रांच्या नुसार हे बांधकाम मॉल चे असून तेथील गाळे लोकांची फसवणूक करून विकले जात असल्याची तक्रार होती म्हणून ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात डोंबिवली ओद्योगिक विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला तर उपसभियंता राज कांबळे यांनी ठाण्याच्या प्रादेशिक विभागामार्फत कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.kan