मनसेच्या सतर्कतेने शहिदांच्या नावाने असलेल्या वास्तूमधील अवैध दारूसाठा जप्त

(म. विजय)

उल्हासनगर दि.१७ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शहिदांच्या नावाने असलेल्या आणि महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या जनरल शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह (टाऊन हॉल),उल्हासनगर-३ येथिल नोंदणी कार्यालयात अवैध दारूचा साठा असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावले.

हेही वाचा :- शेतकरी पुन्हा एकदा संकटात टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

भाजप चे शहर जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार कुमार ऐलानी आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईत संबंधितांना वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध दारू साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरूच ठेवली.

हेही वाचा :- बदलापूर बारवी धरणाची उंची ४ मीटरने वाढवली बारवी धरण हाऊसफुल

यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,जिल्हा-सचिव संजय घुगे,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शहर संघटक मैनुद्दीन शेख,सह-सचिव प्रविण माळवे,उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव,मुकेश सेठपलानी,काळू थोरात,सागर चव्हाण,बादशहा शेख,अक्षय धोत्रे,बनसोडे,अनिल गोधडे तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Devendra Fadnavis के महा-जनादेश यात्रा पर अंड्डे और कडकनाथ मुर्गे वरसे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email