तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, – उद्धव ठाकरे

मुंबई दि.१९ :- सत्तेत असताना ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवार जेव्हा सभा घेत होते त्याचवेळी पाऊस पडू लागला. मात्र शरद पवार यांनी भाषण न थांबवता भर पावसात कार्यकर्त्यांचं संबोधन सुरु ठेवलं. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले.

हेही वाचा :- Live News ; शिवसेना मनसे समर्थकांमध्ये राडा

पवारांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेवरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे. सत्तेत असताना ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते साताऱ्याच्या माणमध्ये बोलत होते. युती सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कसे दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा :- Dombivali ; गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे

यावरून उद्धव ठाकरे यांनीही पवारांना खडेबोल सुनावले आहे. दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणूकही होत आहे. या निवडणुकीत भाजपने उदयनराजेंना तिकीट दिले आहे .

Hits: 1

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email