मुंब्रा बायपासवर दगडफेकीत दोन लहान मुले गंभीर जखमी
मुंब्रा दि.१४ – बायपासने न जाणा-या मोटरीवर केलेल्या दगडफेकीत दोन लहान मुले गंभीर जखमी झाली. या मुलांना उपचारांसाठी मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंब्रा कौसा परिसरात राहत असलेले अमजद खान त्यांच्या कुटुंबासह रविवारी पहाटे तीन वाजता बायपासने मोटरीमधून घरी चालेले होते. त्याचवेळी मोटरीच्या दिशेने अनोळखी व्यक्तीने मोठा दगड फेकला. तो मोटारीच्या मागच्या सीटवर बसलेली खान यांची आठ वर्षाची मुलगी हबीबा तसेच मोहम्मद साद यांना लागला. यात मुलगी हबीबा किरकोळ जखमी झाली. तर मुलगा मोहम्मद गंबीर जखमी झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हेही वाचा :- कमल हसन ह्यानी देशाला वाटणारया विधाने करू नये – विवेक ओवराय
Please follow and like us: