भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार दोघे गंभीर जखमी

डोंबिवली दि.३०  :- एका भरधाव रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराला मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना कल्याण जवळच्या शहाड परिसरात घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्याण परिसरात राहणारा रोहन राठोड (19) हा आपल्या दुचाकीने त्याचे मित्र रोशन सपकाळे (16) आदित्य पराड (18) या दोघांना घेऊन मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सूमारस शहाड बंदार पाडा येथून जात होता.

हेही वाचा :- कल्याणमध्ये थरार, मोबाईल हिसकावणाऱ्यावर झडप दुसरा, चोरटा पसार

याच दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत रोहन याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर रोशन सपकाळे आणि आदित्य पराड हे दोघे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. या प्रकरणी भरधाव रिक्षा चालवणारा चालक फरीद काझी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.