डोंबिवलीतील धोकादायक इमारतीच्या दोन मजल्यावरील खिडकीचा स्लॅब कोसळला

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१५ – रामनगर भागात स्टेशन समोर असलेली तळ अधिक चार मजली या धोकादायक जाहीर केलेल्या इमारतीच्या तीन व चार मजल्यावरील खिडकीच्या छताचा भाग जोरदार वाऱ्यामुळे मोठा आवाज करत कोसळला ,सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसले तरी इमारत रिकामी करण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे तळ अधिक चार मजली इमारत 35 वर्षांपूर्वी बांधलेली होती “ग “प्रभागाने या इमारतीला धोकादायक जाहीर करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस दिली होती. पण इमारतीचे मालक विजय म्हात्रे व इतर भागीदार यांचे वाद असल्याने कोणी लक्ष दिले नाही.

तळ मजल्यावर 10 दुकाने ,पहिल्या मजल्यावर साई पूजा हॉटेल व बार ,तिसऱ्या मजल्यावर हॉल असून बाकी मजले रिकामे आहेत. या इमारतीत कोणीही रहात नसल्याचे “ग “प्रभाग अधिकारी चंद्रकात जगताप यांनी सांगितले. इमारत मालकामध्ये अंतर्गत वाद असल्याने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट कुणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला असून सुरक्षेच्या कारणामुळे इमारत रिकामी करण्यात आली असेही जगताप यांनी सांगितले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने भविष्यात काय वाढून ठेवले असा आहे. ही घटना समजताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस ,अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते इमारती जवळ जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email