आनंदनगर झोपडपट्टी ते महापौर चा प्रवास

ठाणे दि.२२ :- जन्म आनंदनगर झोपडपट्टी… वयाची ४२ वर्षे दीडशे चौरस फूटांच्या खोलीतलं वास्तव्य… वडिलांच्या अकाली निधनामुळे कोसळलेला दुःखाचा डोंगर… शाळकरी वयातच खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी… अर्थार्जन करत करत घेतलेले शिक्षण… शिक्षणाच्या सोबतीने कला, क्रीडा आणि सांस्कृतीक क्षेत्रातली वाढललेली रुची… समाजकारणाच्या जोडीने लागलेली राजकारणाची गोडी… कधी आंदोलनांनी दणाणून सोडललेले रस्ते तर कधी गाजवलेलल्या प्रचार सभा… आयुष्यात असे असंख्य सुखदुःखाचे प्रसंग झेलत आपले कर्तृत्व सिध्द केलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि ठाणे महापालिकेतील जेष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांना ठाण्याचे प्रथम नागरीक अर्थात महापौर होण्याचा समान प्राप्त झाला आहे.

हेही वाचा :- ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निर्मात्याला जितेंद्र आव्हाडांची धमकी, म्हणाले…

नरेश म्हस्के यांचा जन्म २४ मार्च, १९७० चा. म्हस्के कुटुंब आनंद नगर झोपडपट्टीत वास्तव्याला होते. नरेश म्हस्के यांनी आपल्या वयाची ४२ वर्षे याच झोपडपट्टीतल्या दीडशे चौरस फुटांच्या खोलीत वास्तव्य केलेले आहे. नरेश म्हस्के यांचे आई-वडिल अशिक्षित असले तरी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाला नौपाडा येथील सरस्वती विद्यालयात प्रवेश घेतला. दहावीला फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण होणारा आनंद नगर झोपडपट्टीतला हा पहिला विद्यार्थी. शिक्षणाची गोडी असलेल्या म्हस्के यांनी शाळकरी वयात अनेक स्पर्धा गाजवल्या. आदर्श विद्यार्थ्याचे पुरस्कारही पटकावले. शिक्षणासोबत त्यांना कला आणि सांस्कृतीक क्षेत्रत रुची होती.

हेही वाचा :- कोर्ट नाका येथील टाऊन हॉल ठाणेकरांसाठी सुरू

त्यामुळे दहावीनंतर प्रतिथयश महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी असतानाही कला, क्रीडा आणि शिक्षणेतर उपक्रमांची रेलचेलल असलेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयातील सांस्कृतीक आणि साहित्यीक व्यासपिठे त्यांनी गाजवली. राज्य पातळीवर राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) मुंबई विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना मिळली. राष्ट्रीय साक्षरता मोहिमेअंतर्गत ‘इच वन टिच वन’ या मुंबई विद्यापिठाच्या मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले. या मोहिमेसाठी पथनाट्याचे लिखण, दिग्दर्शन ते अभिनयापर्यंतच्या अनेक आघाड्यांवर म्हस्के यांनी आपला ठसा उमटवला.

हेही वाचा :- ठाणे जिल्ह्यातील शाळांना आरटीई प्रतिपूर्तीसाठी ४ कोटी मंजूर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. सांस्कृतीक आणि सामाजीक उपक्रमात सहभागी होत असताना काँलेजमधिल निवडणूकासुध्दा त्यांनी गाजविल्या. कधी बिनविरोध तर कधी विक्रमी मताधिक्याने विजय नोंदविले. भारतीय विद्यार्थी सेनेचा झेंडा मुंबई विद्यापिठावर फडकला तेव्हा ३३ पैकी २२ यूआर हे ठाणे जिल्ह्यातले होते. त्या विजयात म्हस्के यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय विद्यार्थी सेनेत कार्यरत असताना त्यांनी केलली आंदोलने आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. हा सारा प्रवास सुरू असताना कौटुंबिक पातळीवर दुःखाचे डोंगर कोसळत होते. म्हस्के यांचे वय अवघे १६ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कधी शिकवण्या घेत तर कधी चणे शेंगदाणे विकून ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होते.

हेही वाचा :- Royal Enfield देशातून या तीन बुलेट बंद करणार?

सामाजीक आणि राजकीय आघाडीवर सक्रीय असताना त्यांनी अर्थार्जनासाठी गॅक्सो कंपनीत नोकरीसुध्दा पत्करली. कंपनीच्या कामगार संघटनेतहा ते सक्रीय होते. शैक्षणिक, सांसकृतीक, सामाजीक आणि राजकीय आघाड्यांवर आपल्या नेतृत्व गुणांची चमक दाखवत असताना शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख स्वर्गिय आनंद दिघे साहेब यांच्या मुशीत वाढण्याची संधी म्हस्के यांना मिळाली. ठाण्याचे दिवंगत आमदार मो. दा. जोशी यांच्या हाताला धरून त्यांनी प्रशासकीय कामकाज समजून घेतले. त्यानंतर जिल्हाप्रमुख रघूनाथ मोरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हस्के यांची राजकीय कारकीर्द ख-या अर्थाने बहरली असे म्हणावे लागेल.

हेही वाचा :- मिरा-भाईंदर शहरास २४ तासाकरीता पाणी पुरवठा खंडित

भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख, नगरसेवक, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते अशी यशाची शिखरे पादाक्रांत करत ठाणे महापालिकेतील सर्वोच्च पदी नरेश म्हस्के यांची वर्णी लागली आहे. केवळ ठाणे शहरच नव्हे तर कल्याण, पालघर, डहाणू, मीरा रोड, अंबरनाथ अशा जिल्ह्यातीलल कानाकोप-यात म्हस्के यांचा दांडगा जनसंपर्क आहे. जिल्ह्यात संघटना वाढविण्यासाठी त्यांनी प्रसंगी सायकल आणि स्कूटरूनही प्रवास केला होता. राजकारणातील पदे भुषविल्यानंतरही त्यांचा सामाजीक आणि सांस्कृतीक क्षेत्रातला ओढा कमी झालेला नाही. विराट सांस्कृतीक मंचाने गेल्या काही वर्षांत ठाणेकरांना अनेक सुरेल कार्यक्रमांचा आस्वाद लुटण्याची संधी दिली आहे. धर्मवीर आनंद दिघे अपंग सेनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी ते भरीव काम करताना दिसतात. आनंद नगरच्या कुष्ठरुग्ण वसाहत, महिला बतच गटांसाठी त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email