देवेंद्र फडणवीस ‘मावळते मुख्यमंत्री’ म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले

सध्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोण होणार असा सर्वानाच पडला आहे. त्यातच आज पुन्हा शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचा ‘मावळते मुख्यमंत्री’ असा उल्लेख करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हेही वाचा :- शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी बंजारा समाजातर्फे भोगभंडारा

सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणे रंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मराठी जनतेसाठी महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे, असा आरोप सेनेने केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. सध्या शिवसेनेला ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची चिंता असल्याचे ही म्हटले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email