शेतकरी पुन्हा एकदा संकटात टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

Hits: 0

औरंगाबाद दि.१७ :- मराठवाड्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. पंधरवड्यापूर्वी ४० ते ५० रुपये किलो दराने विकणाऱ्या टोमॅटोला आज केवळ चार ते पाच रुपये भाव मिळत असल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळात खचला आहे.

हेही वाचा :- बदलापूर बारवी धरणाची उंची ४ मीटरने वाढवली बारवी धरण हाऊसफुल

त्यात काही ठिकाणी पीकं आली मात्र त्याला भाव नसल्यानं शेतकऱ्यांना पीकं रस्त्यावर फेकून देण्याची वेळ औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द या गावात टोमॅटोचं चांगलं पीक आलं आहे.

हेही वाचा :- न्यू जर्सीचे राज्यपाल फिलीप डी. मर्फी पंतप्रधानांच्या भेटीला

पण टोमॅटोचे भाव मात्र कोसळले आहे. अगदी तीन ते चार रुपये किलो टोमॅटोला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱयांचे अताेनात नुकसान होत आहे. जेवढा खर्च त्यांच्या उत्पादनाला लागला तेवढा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. तर काही ठिकाणी जनावरांना खायला देण्यात येत आहेत. पाऊस सुरू असल्यानं दूरपर्यंत टोमॅटोची वाहतूक सुद्धा करता येत नाही.

देवेंद्रू तू दयाळू, पक्षप्रवेश दाता. केले घोटाळे मी, अभय दे आता.

Leave a Reply

Your email address will not be published.