नाल्यात बेवारस सापडलेल्या ‘टायगर’ने मृत्यूला पुन्हा चकवा दिला

नाल्यात बेवारस सापडलेल्या टायगर या नवजात शिशूने पुन्हा एकदा मृत्यूला चकवा दिला आहे. मेंदूला इन्फेक्शन झाल्याने वाडिया रुग्णालयात दाखल झालेल्या टायगरवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. काही दिवसांतच त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी गेल्या महिन्याभरापासून पदरमोड करून धडपड करणाऱ्या रानडे दाम्पत्याच्या मेहनतीला यश आले आहे. डिसेंबर महिन्याच्या 30 तारखेला कडोळगावच्या नाल्यात काळ्या पिशवीत बांधून एका नकजात अर्भकाला फेकण्यात आले होते.

हेही वाचा :- अण्णा हजारे जनतेचा आवाज उपोषणाच्या माध्यमातून समोर आणतात – रावसाहेब दानवे

त्याच्या रडण्याच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी त्याला बाहेर काढल्यावर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे-जयश्री रगडे या दाम्पत्याने त्याला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. तिथे नऊ दिवसांनंतर त्याची प्रकृती चिंताजनक बनल्यावर न्यायालयाच्या परवानगीने पोलीस व रगडे दाम्पत्याने त्याला साई-आशीष या खासगी रुग्णालयात दाखल केले. 22 दिवसांनी बाळाने स्माईल दिल्यावर रगडे दाम्पत्याने त्याचे नाव टायगर ठेवले. टायगरच्या मेंदूला इन्फेक्शन झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी काडिया हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाडियाच्या डीनला फोन केल्यावर त्यांनी या रुग्णाला विशेष प्राधान्य

Leave a Reply

Your email address will not be published.