कल्याणात भरदिवसा घरफोडी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी घरात ठेवलेले पैसे चोरले
डोंबिवली दि.०५ :- कल्याण डोंबिवली मध्ये घरफोडीच्या वाढत असून चोरट्यांनी एकच उच्छाद मांडला आहे .रात्रीच्या सुमारास बंद घरे हेरून कुलूप तोडणारे चोरटे आता दिवसा ढवळ्या ही बंद घराचे कुलूप तोडून घरातील मुद्देमाल लंपास करत असल्याचा घटना समोर येत आहेत त्यामुले नागतिक धास्तवले आहेत. अशीच एक घटना कल्यानात घडली आहे. कल्याण पश्चिम रामबाग परिसरात भरदिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड, अमेरिकन डॉलर्स असा मिळून तब्बल २२ लाख ६५ हजरांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा :- एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?
दरम्यान तक्रारदार महिलेची मुलगी परदेशी शिक्षन घेत असून फी भरण्याकरिता महिलेने स्वतःचा गाळा विकून मिळालेली रोकड घरात ठेवली होती. कल्याण पश्चिम रामबाग लेन ३ मधील मेघना सोसायटी मध्ये राहणाऱ्या निशा भट्ट या महिला कुटुंबासह राहतात त्यांची मुलगी परदेशात शिक्षण घेत असून फी भरण्याकरिता त्यानि गाळा विकून मिळालेले पैसे घरात ठेवले होते. त्यांची मुलगी काही दिवसाकरीत घरी आली होती. भट्ट आपल्या मुलीसह काल सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
हेही वाचा :- डोंबिवलीकर शेफचा विश्वविक्रम २५ हजार बटाटावाड्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याची संधी साधत त्यांच्या घराच्या सेफ्टी डोअरसह दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसून घरातील लोखंडी कपाट उघडून कपटामधील सोन्या चांदीच्या दागिने, रोकड, अमेरिकन डॉलर्स, क्रेडिट कार्ड, कागदपत्रे असा एकूण २२ लाख ६५ हजरांचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास निशा घरी परतल्या असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. फी भरण्यासाठी घरात ठेवलेली रोकड ही चोरीस गेल्याने भट्ट याना धक्का बसला. त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता सदर तपासकामी तीन पथके तैनात करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे सांगितले.
Hits: 1