महाआघाडीत फुट हजारो कार्यकर्त्यांचा रुख मनसेकडे

मुंबई दि.०६ :- राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक बदल होताना काही काळात दिसणार आहेत. येत्या २३ तारखेला मनसेचं मुंबईत पहिला महाधिवेशन भरणार आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेतील काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद आहे.

हेही वाचा :- Ulhasnagar ; भाजप नगरसेविकेच्या पतीने मागितली १ कोटीची खंडणी

वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय अनेकांना पचनी पडला नाही, त्यामुळे आता पर्याय कोणता असा प्रश्नही अनेकांसमोर उभा राहिला आहे. यातूनच, शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेत प्रवेश केला.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवली शहरात मंगळवारी पाणी नाही

या पक्षप्रवेशात, रायगडमधील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय विविध शहरं, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरेंशी मनसे नातं जोडलंय.महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्येही राजी-नाराजी दिसून येत आहे. त्यामुळेच, राजीनामानाट्य पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :- स्वयंपाकघरात घुसला भलामोठा साप सापाला पाहून कुटूंबाने ठोकली धूम 

तसेच मनसे नव्याने उभारी घेईल हे सत्य आहे. सर्वच स्तरावर मनसे बदलेली असेल हे नक्की आहे. धोरणात्मक आणि अमुलाग्र बदल होताना पक्षात दिसतील. पक्षाचे इंजिन चिन्ह भविष्यातही तेच राहील यात अडचण नाही. मात्र १२ वर्ष झाल्यानंतर संघटनेत बदलत्या काळानुसार काही बदल करणं योग्य वाटतं ते आम्ही करत आहोत. नवीन ऊर्जा, नवीन बळ देणारी संघटना २३ तारखेला सगळ्यांना दिसेल असं सांगत नितीन सरदेसाई यांनी मनसेच्या नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत.

Hits: 4

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email