राज्य सहकारी बँकेतील घोटाळा २५ हजार कोटींचा हे न्यायालयाचे मत
(श्रीराम कांदु)
मुंबई दि.०२ :- राज्य सहकारी बँकेत साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असावा असे मत मा. उच्च न्यायालयाने व्यक्त केले असून ते भाजपने किंवा सरकारने व्यक्त केलेले नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री मा. आशीष शेलार यांनी मंगळवारी मुंबईत केले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणारे त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या प्रसंगी गप्प का , असा सवालही मा. शेलार यांनी यावेळी केला. भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा :- आदित्य ठाकरेंचा भाऊ देखील निवडणूक लढवणार?
यावेळी माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते विश्वास पाठक आणि प्रवक्त्या श्वेता शालिनी उपस्थित होते .मा. आशीष शेलार म्हणाले की , राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेत ११ हजार कोटींच्या ठेवी आहेत, मग या बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा कसा होऊ शकेल असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र या व्यवहारात २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असे भाजप अथवा सरकार म्हणत नसून उच्च न्यायालयाने असे मतप्रदर्शन केले आहे.
हेही वाचा :- कितीही प्रयत्न केला तरी शिवस्मारकात काँग्रेस-राष्ट्रवादीला दोष काढता येणार नाही
साखर कारखान्यांची विक्री करताना त्या कारखान्यांच्या शेतकऱ्यांनी खरेदी केलेले भागभांडवल, त्या कारखान्याची जमीन अशा अनेक घटकांचा विचार करूनच २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने व्यक्त केल्याचे मा. शेलार यांनी निदर्शनास आणून दिले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेने केलेल्या व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश देऊन समिती नियुक्त केली होती. या संदर्भात एवढ्या मोठ्या घडामोडी होत असताना पृथ्वीराज चव्हाण हे गप्प का आहेत, त्यांनी या व्यवहारांबाबत बोलले पाहिजे, असेही मा. आशिष शेलार म्हणाले.
दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहित नाही… सगळ्यात मोठा विनोद