भारत बंदला प्रतिसाद मिळणार नाही – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
(कर्ण हिंदुस्तानी)
मुंबई दि. 7 – भारत बंदला पंजाब हरयाणा वगळता देशात कुठेही प्रतिसाद मिळणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही केंद्र सरकार ची भूमिका आहे.त्यासाठी शेतकरी संघटनांशी चर्चा होत असुन यावर सकारात्मक तोडगा निघेल. कायद्यात सुधारणा होईल मात्र सर्व कायदाच रद्द करण्याची टोकाची भूमिका शेतकरी संघटनांनी घेणे योग्य नाही.
शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यामुळे कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. या कायद्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त जिथे कृषीमालाला अधिक मूल्य मिळेल तिथे विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.तरीही या कायद्यात ज्यावर आक्षेप घेण्यात येत आहे त्या मुद्द्यांवर बदल करण्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केले आ आहे.
त्यानुसार शेतकरी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चर्चा करावी. उद्याचे भारत बंद चे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.