महासभेत राडा होऊ शकतो या ‘इनपुट’ने पोलिसांचा अलर्ट, नगरसेवकांच्या गाडया केल्या चेक

( बालकृष्ण मोरे )

कल्याण दि.०३ :- कल्याण डोंबिवली महापालिकेत शुक्रवारी काही विशेष ‘इनपुट’ मिळाल्याने पोलिसांनी नगरसेवकांच्या गाड्या चेक केल्या. यातील एका गाडीत लाकडी ‘बेस बॉल स्टिक’ मिळाल्याने ही गाडी पोलिसांनी बाजरपेठ पोलीस स्थानकात नेली. पालिकेच्या महासभेत काही विशेष विषय आला होता.या विषया मुळे महापालिकेत राडा होऊ शकतो असे ‘इनपुट’ मिळाल्याने हे सर्च ऑपरेशन करण्यात आल्याचे एसीपी अनिल पोवार यांनी या बाबत बोलताना सांगितले. या कार सर्च ऑपरेशन मध्ये काही गाड्याना काळ्या फिल्म लावण्यात आल्याने पोलिसांनी या काळ्या फिल्म उतरविल्या.

हेही वाचा :- जिंकण्याचा विश्वास आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत ; राज ठाकरे

यात महापालिका सभागृह नेता शिवसेनेचे श्रेयस सामेळ यांच्या गाडीचाही समावेश आहे. या बरोबरच या गाड्यांचे ‘इ चलान’ कापण्यात आले.हे गाड्याचे सर्च ऑपरेशन करण्यात आल्याने काही दबंग नगरसेवकानी महापालिकेतून काढता पाय घेतला.यातील काही नगरसेवकांवर पूर्वीच्या सर्च ऑपरेशन मध्ये पोलिसांनी कारवाई केली होती. काही दिवसा पूर्वी देखील असेच गाड्यांचे ‘सर्च ऑपरेशन’ करण्यात आल्या वर या गाड्यात हॉकी स्टिक, दांडे मिळाले होते.या मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेच्या वेळस पोलीस विशेष खबरदारी घेत असतात.

kdmc महासभेत राडा होऊ शकतो या ‘इनपुट’ने पोलिसांनी,नगरसेवकांच्या गाडया केल्या चेक
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email