डोंबिवलीत उद्योगपतीच्या घरात चोरी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला
डोंबिवली – डोंबिवली येथील राहणारे उद्योगपती विजय पालकर यांच्या घरात चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली आहे. घरात दोन व्यक्ती गाढ झोपेत असताना चोरटे घरात घुसले आणि घरातील सुमारे ५० लाखांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोकड रक्कम घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे पालकर यांच्या घरात अलार्म यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा, पाळीव कुत्रा आणि वॉचमन असतानाही हा दरोडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा :- भावाच्या मृत्यूची बातमी एकूण मोठ्या भावाचा मृत्यू
इंडो अमाईनचे मालक, प्रसिद्ध उद्योगपती विजय पालकर यांच्या डोंबिवली येथील घरी पहाटे चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म यंत्रणा आणि वॉचमन असतानाही या चोरट्यांनी पालकर यांच्या घरात डल्ला मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. त्यामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने या चोरीप्रकरणी तपास करत आहेत.